MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF

MPSC Combine Syllabus 2022: Maharashtra Subordinate Services Group B Examination is going to be conducted by the Public Service Commission authorities of the state in the upcoming months. Candidates who are preparing for MPSC Combined Exam (PSI STI ASO) can get the link to download the syllabus on this page. Download MPSC Combine Syllabus. Check syllabus here for Prelims and Mains Exam. Find all details here.

MPSC Combine Syllabus Overview

Organization NameMaharashtra Public Service Commission (MPSC)
Post NamePolice Sub Inspector (PSI), State Tax Inspector (STI), and Assistant Section Officer (ASO)
Total Vacancy666 (as per 2021)
Prelims Exam Date26 February 2022 (for 2021)
Mains Exam Date (Combined Paper 1)22 January 2022 (for 2020)
CategoryMPSC Syllabus
Job LocationMaharashtra
Official Sitempsc.gov.in

MPSC Combine Syllabus 2022

Aspirants can download the MPSC Subordinate Services Group B Syllabus 2022 PDF below.

MPSC Combine SyllabusDownload

दुय्यम सेवा परीक्षा सामायिक अभ्यासक्रम

तीन वेगवेगळ्या विभागांमधील वेगवेगळ्या जबाबदारी व कार्यक्षेत्रातील पदांसाठी दुय्यम सेवा परीक्षेचे आयोजन आयोगाकडून करण्यात येते. त्यामुळे या परीक्षेतील काही भाग हा सर्व पदांसाठी संयुक्त (common) तर काही भाग हा पदनिहाय स्वतंत्र आहे. तिन्ही पदांसाठी सामायिक असलेल्या अभ्यासक्रमाची माहिती या पेजवर दिलेली आहे. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पेपर एक हा भाग तिन्ही पदांसाठी संयुक्त आहे. तर मुख्य परीक्षा पेपर दोनमधील बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्था हा भाग तिन्ही पदांसाठी एकसारखा आहे.

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

 • चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
 • नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
 • इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
 • भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
 • अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
 • सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene).
 • बुद्धिमापन चाचणी व अंक गणित : बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.

मुख्य परीक्षा संयुक्त पेपर (पेपर क्रमांक एक) अभ्यासक्रम

 • मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्‍नांची उत्तरे
 • इंग्रजी : Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaning and comprehension of passage.
 • सामान्य ज्ञान
 • चालु घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
 • माहिती अधिकार अधिनियम 2005
 • महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
 • संगणक व महिती तंत्रज्ञान : आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (case law) नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मुलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.

मुख्य परीक्षा पदनिहाय स्वतंत्र पेपर (पेपर दोन) सामायिक मुद्दे

मुख्य परीक्षा पेपर दोन प्रत्येक पदासाठी स्वतंत्र असला तरी त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी हा घटक समान आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे :

 • बुद्धिमत्ता चाचणी
 • महाराष्ट्राचा इतिहास : सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ
 • महाराष्ट्राचा भूगोल : महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पुर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्‍न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.
 • भारतीय राज्यघटना : घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रसतावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका. (तिन्ही पदांसाठी)

राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ Role, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य, विधि समित्या. (केवळ ASO व STI साठी)


MPSC Combine Exam Pattern

एमपीएससी दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षा – पात्रता व परीक्षा योजना: दुय्यम सेवा गट ब ही परीक्षा सामान्य प्रशासन विभागा अंतर्गत लिपिक टंकलेखक, वित्त विभागा अंतर्गत राज्य कर निरीक्षक आणि गृह विभागा अंतर्गत पोलिस उप निरीक्षक या गट ब (अराजपत्रित) पदांसाठी घेण्यात येते. या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रम, अर्हता, पात्रता आणि वयोमर्यादा तसेच थोडक्यात परीक्षा योजना यांबाबत सर्व माहिती खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्हता. (मराठीचे ज्ञान आवश्यक)

वयोमर्यादा: मागासवर्गीय तसेच अन्य प्रवर्गासाठी शिथिल केलेली कमाल वयोमर्यादा ही केवळ त्या त्या प्रवर्गातील Non Creamy Layer वर्गातील उमेदवारांसाठीच लागू होते. तर अनूसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही Non Creamy Layer ची अट लागू नाही.

पोलिस उप निरीक्षक पदाकरिता शारीरिक पात्रता:

पुरुष उमेदवारांकरितामहिला उमेदवारांकरिता
उंची – १६५ सेंमी (किमान); छाती न फुगविता ७९ सेंमी व फुगविण्याची क्षमता – किमान ५ सेंमी.उंची – १५७ सेंमी (किमान)

पूर्व परीक्षा: वरील तीन पदांसाठी पूर्व परीक्षेचा पेपर संयुक्त असला तरीही पुढील टप्यावर वेगवेगळे पेपर, अभ्यासक्रम आणि टप्पे विहीत केलेले आहेत. त्यामुळे दुय्यम सेवा पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध झाल्यावर पूर्व परीक्षेसाठी अर्ज करतानाच उमेदवारांना आपण कोणकोणत्या पदांसाठी परीक्षा देणार आहोत, ते नमूद करावे लागते.

तिन्ही पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे: सामान्य क्षमता चाचणी या विषयासाठी वस्तुनिष्ठ स्वरुपाचे १०० प्रश्न , १०० गुणांसाठी असतील. कालावधी १ तास. परीक्षेचा दर्जा पदवी समकक्ष.

पूर्व परीक्षेमध्ये तिन्ही पदांसाठी एकच संयुक्त पेपर असला तरीही प्रत्येक पदासाठीच्या मुख्य परीक्षेसाठी पूर्व परीक्षेचा निकाल स्वतंत्रपणे लागतो. उमेदवारांचे गुण तेच असले तरी प्रत्येक पदासाठी उपलब्ध पदांची संख्या वेगळी असल्याने कट ऑफ वेगवेगळा लागू शकतो. आणि एकच उमेदवार एका पदासाठीच्या निकालामध्ये उत्तीर्ण दुसज्या पदाच्या निकालामध्ये अनुत्तीर्ण ठरू शकतो.

मुख्य परीक्षेचे स्वरूप: तीन पदांसाठी पूर्व परीक्षा संयुक्त असली तरी मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक पदासाठी काही भाग वेगवेगळा असतो .

परीक्षेचे टप्पे:

मुख्य परीक्षा लेखी परीक्षा योजना:


Hope all candidates have downloaded the MPSC Combine Syllabus 2022 in Marathi Pdf along with Exam Pattern in the above-attached link. For latest updates keep visiting our site MPSC Topper regularly.

1 thought on “MPSC Combine Syllabus 2022 in Marathi PDF”

Leave a Comment